
बीड शहरातील खासबाग येथील भाजी मार्केट मध्ये रोज पहाटे भाजी विक्रेते आपला भाजीपाला आडत मार्केटमध्ये देण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असून खासबाग परिसरात दत्ता अडागळे या दलित तरुणाला तेथील कैसर आणि जिहाद या दोन भावांसह अन्य अज्ञात दोघांनी मिळून दगड डोक्यात मारुन जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्याने मारहाण करत डोक्याला मार मागल्याने त्याला बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबतची तक्रार शहर पोलीस स्टेशनला नोंदवून घेण्यासाठी पोलीसांनी पुर्ण दिवस वेळ लावत मध्यरात्री मारहाणीचा गुन्हा नोंद केला. दत्ता अडागळे यांना मारहाण करणार्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी मनसेचे सोमेश्वर कदम यांनी शहर पोलीस ठाण्यात जावून केली आहे.
यावावत माहिती अशी की, दत्ता लक्ष्मण अडागळे हे हमालीचे काम खासवाग येथील आडत दुकानी करतात त्यांनी दि. २० एप्रिल रविवार रोजी पहाटे ४ सुमारास भाजीपाल्याचा अॅटोरिक्षा आडत मार्केट येथे घेवून गेला यावेळी दत्ता अडागळेयाला इसाक शेट यांच्या दुकानी माल टाकायचा होता. त्यावेळी तेथे असणारा कैसर म्हणाला की इसाकचा माल आहे का त्यावळ दत्ता म्हणाला हो. त्यानंतर झालेल्या कुरबुरीत जातीवर शिवी देत तु काय करशील तुझे हातपाय तोडेल मी असे म्हणून अंगावर धावला त्यावेळी दत्ता याने भांडण मिटवते घेवून माल इसाक यांच्या आडत दुकानी ठेवला आणि वाहेर जावू लागला परंतू कैसर याने दत्ता गेटच्या वाहेर जात असतांना दगड घेवून कपाळवर फेकून मारला व त्यानंतर वाजूला असणारा जिहाद याने दगड घेवून डोक्याच्या मागे मारला त्यानंतर अन्य दोन व्यक्तींनी लाथाबुक्क्याने मारहाण केली हा सर्व प्रकार घडलेला पोलीसांना सांगितल्यानंतर पोलीसांनी मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यासाठी देखील मध्यरात्रीचे १ वाजव गंभीर मारहाण केली असतांनाही तसेच जातीवाचक शिवीगाळ केलेली असतांना मारहाणीचा गुन्हा नोंदविला असून पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी मनसेच्या सोमेश्वर कदम यांनी केली आहे.