ब्रेकिंग न्यूज

बीड बसस्थानकात महिलाकडे पाहून लज्जा येईल असे चाळे करणारास नागरिकांनी बदडले.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस माहिती देऊन देखील आले नाही.

बीड बसस्थानकात एकाने महिला समोर बसलेल्या असताना अक्षपार्य चाळे केल्याने नागरिकांनी त्याला बदलल्याची घटना दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी घडली.

सध्या सुट्टया आणि लग्नसराईमुळे बीड बस स्थानकात मोठी गर्दी होत आहे. त्यातच बसस्थानकाचे काम सुरु असल्यामुळे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा स्थानकात महिला बसलेल्या असतांना महिलांच्या मागे थांबून एकाने महिलांना लज्जा येईल असे प्रत्येक केल्याने संताप व्यक्त होत असून बीड बसस्थानकात पोलीस चौकी आहे मात्र चौकीत पोलीस नसतात हा आतापर्यंतचा प्रवाशांचा अनुभव आहे.अनेक वेळा शोधून सुद्धा पोलीस सापडत नाहीत,सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एक नराधम महिलांच्या पाठिमागे उभे राहून सर्वांच्या देखत अतिशय घाणेरडे चाळे करत होता, मात्र त्याला रोखण्यासाठी तिथे एक सुद्धा पोलीस कर्मचारी नव्हता. त्याचे हे चाळे नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले आहे. हा प्रकार पाहून तेथील प्रवाशांनी तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना माहिती दिली परंतु उशिरापर्यंत पोलीच आलेच नाहीत. तोपर्यंत त्या नराधमाचे चाळे सुरुच असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर तो नराधम तिथून निघून गेला. सदरील नराधम हा न्यायालय अस्थापनेवरील कर्मचारी असल्याचे समजते. अत्यंत किळसवाणा प्रकार करत असतांना त्या कर्मचाऱ्याला काहीच वाटले नाही, विशेष म्हणजे सध्या बसस्थानकात गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी २४ तास पोलीस कर्मचारी असणे बंधनकारक आहे. मात्र एवढं होऊन सुद्धा त्या ठिकाणी एकही पोलीस आला नाही, शेवटी लोकांनाच त्याला बदडून काढावे लागले. या प्रकारामुळे संताप व्यक्त होऊ लागला असून बस स्थानिकां मध्ये पाकीट माराचा व खाजगी वाहने भरणाऱ्यांचा सुळसुळाट असुन पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.बसस्थानकात नियुक्त पोलीस कर्मचारी नेमके कुठे गेले होते?असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे बस स्थानकातील पोलिसांची उचलबांगडी करावी अशी मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button