ब्रेकिंग न्यूज

माजलगावात डोक्यात दगड घातल्याने एक गंभीर जखमी.घटना सीसीटीव्हीत कैद.

जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी,गुंडगिरी कमी करण्यास पोलिस अपयशी?

 

बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या अथक परिश्रमा नंतरही वाढती गुन्हेगारी,गुंडगिरी काही कमी होताना दिसत नाही. माजलगाव मध्ये मागील आठ दिवसात दोन खून झालं झाल्याने माजलगाव हादरले असून, दोन्ही खुनातील आरोपी माजलगाव पोलिसांच्या ताब्यात आहेत.खुनाची ही घटना ताजी असतानाच आज दुपारी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर महिंद्रा ट्रॅक्टरच्या शोरूम समोर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होऊन डोक्यात दगड टाकल्याने उत्तम बाबुराव विग्ने हे गंभीर जखमी जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. डोक्यात दगड घालताच उत्तम विघ्ने हे जागेवरच बेशुद्ध पडले त्यानं स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. भांडणे का व कशामुळे झाली याची माहिती अद्याप मिळाली नसून काही वेळात सविस्तर व्रत देण्यात येईल. डोक्यात दगड घालतानाचा सीसीटीव्ही फुटेज प्रसार माध्यमावर व्हायरल झाला झाल्याने एकाच खळबळ उडाली असून गुंडगिरी,दादागिरी,भाईगिरी करणाऱ्या वर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button