ब्रेकिंग न्यूज

बीड बसस्थानक आहे की चोरांचा अड्डा ? रोजच चोऱ्या

बसस्थानकात चोरांना शिवाजी नगर पोलिसांचे अभय आहे का.?

बीड बसस्थानक चोरट्याचा अड्डा बनला आहे.रोजच प्रवासाच्या गळ्यातील सोने लंपास होत असल्याच्या तक्रारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

प्रवासाच्या गळ्यातील सोने तसेच प्रवाशाचे पाकीट मारीच्या घटना मध्ये वाढ होत असल्याने शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारच्या वेळी नंदिनी अंबादास दहिफळे राहणार खडकवाडी या गावाकडे जाण्याकडे बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गळ्यातील गंठण लांबवल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा बीड बसस्थानकात सकाळी एका प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.

शांताराम कुंडलिक वायकर वय 58 वर्षे हे बीड शहरातील धांडे गल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलीला भेटून परत नेवासा या गावी जात असताना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गळ्यातील चैन तोडून लंपास केली. बस मध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात येतात आरडाओरड केली.त्यावेळी मुलगा शिवनाथ व पत्नी मुटुकाबाई यांनी चोरट्याला आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढ्यात तो चोरटा पसार झाला. सोन्याच्या चैन ची किंमत 1,20,000/-रुपयाची होती त्याचे वजन 30.060 मिली ग्रॅम असल्याची पावती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देऊन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रोजच बीडच्या बसस्थानकातून असे सोन्याचे चैन, प्रवासाच्या खिशातील पैसे, पाकीट लंपास होत असल्याने पोलिसाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पोलिसांचे चोरांना तर अभय नाही ना, पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष तर करत नाहीत ना असा प्रश्न प्रवाशांना व नागरिकांना पडला आहे. बीड बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरणारी टोळी असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे बसस्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून 24 तासासाठी पोलीस कर्मचारी नेमणूक करावी अशी देखील मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button