मुलाने गळफास घेतल्याची माहिती कळताच आईने विष घेऊन जीवन संपले
आमला वाहेगाव येथील हृदयदायक घटना.

बीड. गेवराई तालुक्यातील आमला वाहेगाव येथील भागुजी खेत्रे यां शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.याची माहिती आईला मिळताच आईनेही विष प्राशन केले. विष प्राशन केल्याची समजतात त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान आईचे आज सकाळी निधन झाले.
मुलगा आणि आई या दोघांचे निधन झाल्याने गेवराई तालुक्यातील आमला वाहेगाव गावावर शोककळा पसरली आहे. अभिमान खेत्रे, कौशल्या भागुजी खेत्रे रा. आमला वाहेगाव (ता. गेवराई) असे मयत मुलगा आणि आईचे नाव आहेत. रविवारी (दि.२८) मुलगा अभिमान खेत्रे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आई कौशल्या खेत्रे यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच आज मंगळवारी (दि.२९) सकाळी १० वाजता कौशल्या खेत्रे यांचे निधन झाले. काल मुलाची आत्महत्या आणि आज आईचे उपचारादरम्यान निधन झाल्याची हृदयदायक घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत आहेत. आई आणि मुलाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.