
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून उष्णतेची लाट आली असून जिल्ह्यातील नागरिक यामुळे हैराण झाले आहेत.जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे.
परळी शहरातील इटके कॉर्नर परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरील आज दुपारी अचानक उभ्या ट्रकला आग लागल्याने या आगी मध्ये ट्रक जळून खाक झाली. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या बाजूला ट्रक उभी असताना ट्रॅक जवळील कचऱ्याने उष्णतेमुळे पेट घेतल्याने ट्रकला आग लागल्याची माहिती मिळत आहे.आग विझवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नसल्याचे किंवा घटनास्थळी अग्निशामक दलाचे वाहन आले नसल्याने ट्रकचे लाखोचे नुकसान झाले आहे. ही आग एवढी प्रचंड होती की आकाशात धुराचे लोळ चे लोळ पसरले होते. या रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली असल्याचे देखील माहिती मिळत आहे.