ब्रेकिंग न्यूज

बॅनर,झेंडे व पोस्टर तात्काळ हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

झेंडे लावण्यावरून झाला होता तणाव निर्माण.

बीड- जिल्हाभरात ठिकठिकाणी सण, उत्सव,जयंती, धार्मिक कार्यक्रम या अनुषंगाने चौकाचौकात रस्त्यांवर बॅनर,झेंडे, पोस्टर्स,लावले जातात. मात्र सण, उत्सव होऊन गेले तरी ते काढले जात नाहीत, मागील आठवड्यात आष्टी तालुक्यातील खडकत येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून गावात तणाव निर्माण फोन दोन गट आमने-सामने भिडले होते, तर दुसरी घटना गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका धार्मिक स्थळांवर झेंडे लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सदरील बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे तात्काळ हटविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध बॅनर्स, होर्डिंग्जस्, पोस्टर्स आणि झेंडे लावण्यात येतात. विशेषतः सण, उत्सव, यात्रा, उर्स, सप्ताह, जयंती, धार्मिक प्रवक्त्यांचे कार्यक्रम इत्यादींच्या अनुषंगाने सर्व समाज व धर्माचे लोक आणि संघटनांकडून जिल्ह्यातील विविध चौकात, मुख्य रोडवर, सार्वजनिक ठिकाणी विविध झेंडे व त्यास अनुसरुन बॅनर लावण्यात येतात.

सदरील कार्यक्रम संपन्न होऊन बरेच दिवस झाले तरी ते काढले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील सर्व अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, झेंडे तात्काळ हटविण्याचे आदेश सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर पालिका प्रशासन, बीड, गेवराई, शिरुर कासार, पाटोदा, आष्टी, माजलगाव, धारुर, वडवणी, अंबाजोगाई, केज, परळी येथील तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि सर्व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button