ब्रेकिंग न्यूज

चार लाख 80 हजाराचा गुटखा बीड शहर पोलिसांनी पकडला.

बीड जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री,अन्न व औषध प्रशासनाची डोळेझाक.

बीड जिल्ह्यात किराणा दुकान,पाणटपरी,हॉटेल वर गुटखा सहज उपलब्ध होत असून अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

 राज्य शासनाने गुटख्यावर बंदी केली असताना देखील बीड जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाना कडून अर्थपूर्ण डोळेझाक केली जात आहे.

बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत गुटखा साठवण व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बीड शहर पोलिसांना मिळाली असता डीपी पथकाने 1) मोमीन मोहम्मद तखीयोद्दीन मोमीन मोहम्मद फजलोद्दीन वय 33 वर्षे, रा.हत्ती खाना कागदी दरवाजा बीड ता.जि. बीड 2). शोएब खान वाजेदखान पठाण रा. जुना बाजार हाफीज गल्ली बीड ता.जि.बीड, 3). वाजेद खान नयीम खान पठाण रा.जुना बाजार हाफीज गल्ली बीड ता.जि.बीड गृ.घ.ता.वे.ठी – दि. 04/28/2025 रोजी 13.35 ते 15.00 वा. चे दरम्यान हत्तीखाना कागदी दरवाजा बीड व हाफिजगल्ली जूना बाजार बीड येथे गु.दा.ता. व वेळ -दि.29.04.2025 रोजी 00.21 वा.मिळाला माल – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्या पदार्थ मध्ये विविध कंपनीचा गुटखा, पान मसाला, तंबाखू. अँपे रीक्षा मिळुन मुद्देमाल 4,47909/- (चार लाख सत्यचाळीस हजार नवसे नऊ) रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंदी असतांना देखील राहत्या घरामध्ये गुटख्याची साठवण करून चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वरील प्रमाणे मुद्देमालाची साठवण करुन ठेवला चार लाख 80 हजाराच्या गुटख्यासह एक ताब्यात घेतला असून पुढील तपास पीएसआय नेवरे करत आहेत.

ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय. शितलकुमार बल्लाळ पोस्ट बीड शहर व एपीआय बाबा राठोड,तसेच पीएसआय नेवरे, यांच्या डी बी टीमने जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद, सुशेन पवार, मनोज परजने यांनी ही कारवाई केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button