ब्रेकिंग न्यूज

नागझरी येथील डोंगराला भीषण आग.

वन विभागाकडून तीन तासापासून आग विझवण्याचा प्रयत्न.

 

बीड तालुक्यातील वनपरीमंडळ अंतर्गत नागझरी वनविभागात आज दुपारच्या सुमारास डोंगराला अचानक भीषण आग लागल्याने डोंगराने पेट घेतला.

बीड जिल्ह्यामध्ये उष्णतेने उच्चांक गाठला असून कालच इमामपूर शिवारातील डोंगर भागाला आग लागल्याची घटना ताजी असताना आज नागझरी येतील डोंगराला आग लागण्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमावर वायरल झाले असून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही,१५ वनविभागाचे कर्मचारी आग विझवण्याच्या प्रयत्नात परंतु आग आटोक्यात आली नाही.

वनविभागाचे कर्मचारी हनुमंत वायभट,दशरथ गुजर, विलास नवले, शंकर शिंदे, मधुकर नैराळे,बबन पाव्हणे, गौतम वीर,बडगे चंद्रकांत, मेटे महेश, अकबर शेख, परमेश्वर पाव्हणे, परमेश्वर नाईक,शहादेव चव्हाण, बळीराम चव्हाण,संदिप पवार, मधूकर वायभट, लक्ष्मण जाधव, बळीराम चव्हाण यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button