ब्रेकिंग न्यूज

१२ वीचा निकाल , ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद सोमवार, दि. ५ मे रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत निकालाची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार असून, संबंधित माध्यमांनी आपल्या प्रतिनिधीची उपस्थिती सुनिश्चित करावी, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

राजीव जोशी

मुख्य संपादक | गंमत भंडारी कार्यकारी संपादक | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 9273701010

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button