ब्रेकिंग न्यूज

ॲड.संगीता चव्हाण अपघातात जखमी.

संगीता चव्हाण यांच्यासह देखील जखमी.दोघांची प्रकृती गंभीर.

बीड दि.७ (प्रतिनिधी):- राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा शिवसेना महिला आघाडीच्या मराठवाडा संपर्क प्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांच्या गाडीला चौंडी (जि.अहिल्यानगर)जवळ अपघात झाला.या अपघातात संगिता चव्हाण यांच्यासह फरजाना बाजी आणि पत्रकार विशाल गणोरकर जखमी झाले आहेत.गणोरकर आणि परजाना बाजी या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

बीड येथून चौंडी येथील कार्यक्रमासाठी जात असतांना अॅड. संगिता चव्हाण यांच्या गाडीला पाठिमागच्या दुसऱ्या वाहनाने डॅश दिल्याने त्यांची गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि समोरील गाडीला धडकली.या अपघातातसंगिता चव्हाण यांच्या हाताला व इतर ठिकाणी मार लागला आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या फरजाना बाजी आणि पत्रकार गणोरकर यांना मात्र जबर मार लागला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या अपघाताची माहिती मिळताच अहिल्या नगर मधील शिवसैनिकांनी दवाखान्यात धाव घेऊन घेतली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button