
बीड जिल्हा पोलीस पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. आज गुरुवारी (दि.८) अध्यक्षपदी अशोक दुबाले, उपाध्यक्ष संघर्ष गोरे तर सचिवपदी ज्ञानेश्वर परळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर संचालकांची निवड करण्यात आली. पोलीस बांधवांना अडीअडचणीच्या काळात मदत मिळावी या हेतूने सुरू करण्यात आलेली बीड जिल्हा पोलीस पतसंस्थेच्या संचालक मंडळांच्या निवडीला पाच वर्ष पूर्ण झाल्याने नवीन संचालक निवडणूक लागली होती. परंतु सर्व सभासद आणि संचालक मंडळाने एकत्र येत बिनविरोध निवडणूक घेण्याचे ठरविले, आज गुरुवारी (दि.८)पतसंस्थेच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अशोक दुबाले, उपाध्यक्ष संघर्ष गोरे, सचिव ज्ञानेश्वर परळकर तर संचालक म्हणून मनोज जोगदंड, मनोज वाघ, नितीन साळवे, सचिन जायभाय, संतोष म्हेत्रे, शहेंशा सय्यद, रेखा गोरे, रंजना सांगळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
चांगल्या कामाची मिळाली पावती…
अशोक दुबाले यांनी पूर्वी साडेसात वर्ष (विरोधी पॅनलला धूळ चारून) आणि आता पुन्हा एकदा पाच वर्ष (बिनविरोध) म्हणून पतसंस्थेचा कारभार पाहणार आहेत. एकाच व्यक्तीला आणि तेही सलग तिसऱ्यांदा संधी मिळणं सोपे नसताना ही किमया साधे करणारे ते एकमेव अध्यक्ष ठरले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत काम करताना असेल किंवा पोलीस पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहताना कायम प्रामाणिक पणा आणि व्यापक दृष्टीने त्यांनी निर्णय घेतल्यामुळे २ हजार सदस्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी देतं चांगल्या कामाची एक प्रकारे पावतीच दिली आहे अस म्हणायला हरकत नाही.सर्व पदाधिकारी व सदस्यांना विजयी समर्पित-दुबाले बीड जिल्हा पोलीस पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हॅट्रिक झाली असली तरी मागच्या दोन टर्म मध्ये पोलिसांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्परता दाखविली आहे. मागच्या काळातील काम, संचालक मंडळाचा विश्वास, सदस्यांनी दाखविलेल्या प्रेमामुळे आजची लढाई एकतर्फी झालेली असून विजय खऱ्या अर्थाने सर्व पदाधिकारी व ना समर्पित आहे.