जनावरे चोरणाऱ्या तिघांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून धुतले.पोलिसांनी सोडून दिले.
जनावरे चोरणारी टोळी बीड शहरात सक्रिय.पोलिसांना एकही गुन्ह्याचा तपास लावला नाही.

बीड शहरात मागील काही महिन्यात जनावरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून शहरातून जनावरे वाहनातून चोरून नेतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झाले होते. स्नेहा नगर भागात जनावरे चोरणाऱ्यां टोळीला विरोध करणाऱ्या नागरिकावर दगडफेक केली होती, तर भाजी मंडई,बालेपीर भागात जनावरे चोरतानाचा सीसीटीव्ही प्रसार माध्यमावर व्हायरल झाला होता.
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माऊली नगर भागात दिनांक 9 मे रोजी रात्री 11 च्या दरम्यान गायी चोरी करणाऱ्या 3 चोरांना रंगेहाथ पकडून चांगलाच चोप देऊन पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.मात्र पेठ बीड पोलिसांनी त्या चोरांना नोटीस देऊन सोडण्याची माहिती मिळत आहे.
पेठ बीड भागात जाधव यांची गाय चोरून नेताना विरोध केल्याने त्यांच्यावर चोरांनी हल्ला केल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. त्यामुळे जनावरे चोरणाऱ्या टोळीची दहशत बीडमध्ये असल्याची दिसत होते. रात्री अंधाराचा फायदा घेत चोरटे बीड शहरातील माऊली नगर भागात असलेले जनावरे अशोक लीलँड क्रमांक MH 01 CV 0109 यात चोरून नेत असताना नागरिकांनी तिघांना रंगेहात पकडून त्या चोरांना चांगले धुतले व पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र पोलिसांनी त्या चोरांना नोटीस देऊन सोडून दिल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संजय निर्माण होत आहे. गेल्या काही महिन्यापासून जनावरे चोराने बीड शहरात धुमाकूळ घातला असून पोलिसांना ते जनावरे चोर सापडत नव्हते,मागील जनावरे चोरणारी गुन्हे उघडतील झाले नाहीत.परंतु नागरिकांनी त्या चोरांना रंगेहात पकडून,त्या चोराकडून तीन जनावरे व पिकप वाहन ताब्यात घेतली असताना त्या चोरांना सोडून का देण्यात आले?असा प्रश्न उपस्थित होत आहे.