पेठ बीड पोलिसांचा मटका जुगार खेळणाऱ्यावर छापा.
चार जुगाऱ्यासह ४०,०००/ चा मुद्देमाल जप्त.

बीड शहरात अवैध धंदे बोकाळले असून चौका चौकात गल्लीबोळात, हॉटेल,टपरीमध्ये मटका जुगार सह गुटखा ओपन विकला जात आहे.मात्र पोलिस अरे धंद्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र सध्या बीड शहरात दिसत आहे.
आज दिनांक 10/05/2025 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पेठ बीड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांना गुप्त माहिती मिळाली की,कडबा मंडी,पेठ बीड हद्दीत काही ईसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळ्याल्यावरुन आम्ही पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज व सोबत पोह / नसीर शेख, पोअं/अल्ताफ शेख, कलीम ईनामदार व चालक पोह / असद शेख यांनी कडबा मंडी याठिकाणी छापा मारला असता काही ईसम हे कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना मिळुन आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सदर इसमांच्या ताब्यातुन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 40,000/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार लोकांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक नवनीत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उप-विभागीय पोलीस अधीकारी विश्वांभर सर यांच्या मार्गदर्शमाखाली पेठ बीड पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज,पोह/ नसीर शेख, पोअं/अल्ताफ शेख, कलीम ईनामदार व चालक पोह/असद शेख यांनी कारवाई केली.पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील मटका, गुटखा,जुगार,दारू सह सर्वच अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.