वाहतूक पोलीस कर्मचारी क्षीरसागर व गोरे यांची उत्कृष्ट कामगिरी.
तीन वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मोटरसायकल मूळ मालकास मिळवून दिली.

बीड(प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे नवनीत कॉवत यांनी घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व चोरी होण्याच्या प्रमाण कमी झाले असून चोरीला गेलेली वाहने,मोबाईल व मुद्देमाल मूळ मालकास मिळू लागल्याने नागरिकांतून याचे स्वागत होत आहे.
दिनांक 13/05/2025 रोजी वाहतूक पोलीस कर्मचारी क्षिरसागर व गोरे हे नगरनाका येथे 5:30 वाजता वाहनाची तपासणी करत असताना एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल क्र.MH-20-EA-1758 या दुचाकी स्वारावर संशय आल्याने थांबवून कागदपत्राची मागणी केली असता सदर वाहन चालक यांनी कागदपत्र घेऊन येतो असे सांगून तो निघुन गेला,मात्र तो दुचाकी स्वार बराच वेळ झाली तरी परत न आल्याने ती मोटरसायकल सुभाष रोड वरील वाहतुक शाखा येथे लावण्यात आले.तो दुचाकी स्वार कागदपत्र घेऊन न आल्याने हे वाहन चोरीचे असल्याचा संशय आल्याने वाहनाच्या अधिक माहितीसाठी दुचाकीचे चेसीस क्रमांक MBLHAW088K5G13470 यावरून वाहनाची ऑनलाईन माहिती काढली असता त्याची चेसी क्रमांकावरून ते वाहन अहमदपूर येथील असल्याचे निदर्शनास आले.त्या दुचाकीचा खरा क्रमांक दुसराच असून त्यावरून ती मोटरसायकल चोरीची असल्याची निष्पन्न झाले.त्या मोटरसायकलचा क्रमांक MH-24-BF-7932 असल्याचे निदर्शनास आले. यावरून वाहतूक शाखा कार्यालया मधून सदर वाहनाचे मुळ मालकास संपर्क केला असता त्यांनी सदरचे वाहन हे चोरीस गेले असल्याचे सांगुन पोलीस स्टेशन अहमदपुर जि लातूर येथे गुरन 514/2021 दिनाक 10/012/2021 रोजी भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तरी सदर गुन्हयातील MH-24-BF-7932 हे पोलीस स्टेशन अहमदपुर यांच्या ताब्यात दिलेले असुन सदर चोरीच्या गुन्हयातील वाहन वापरणा-या (वाहन सोडुन गेलेल्या) इसमांचा स्थानिक गुन्हे शाखा बीड, तसेच बीड शहरातील स्थानिक पोस्टे बीड शहर, बीडग्रामिण,पेठ बीड, शिवाजीनगर येथिल बिट अंमलदार व डिबी पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे.
वाहतूक पोलीस कर्मचारी क्षीरसागर व गोरे यांच्या सखोल तपास व चौकशीमुळे तीन वर्षापूर्वी चोरीला गेलेली मोटरसायकल मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आली. वाहतूक पोलीस कर्मचारी शिरसागर व गोरे यांनी मूळ मालकास वाहन मिळवून दिल्याने मूळ मालकांनी आभार मानले.