ब्रेकिंग न्यूज
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे वकील काय म्हणाले पहा.
विष्णू चाटेनी जामीन अर्ज मागे घेतला,पुढील सुनावणी ३ जून रोजी.

केज तालुक्यातील मसाजोग येथील पवनचक्की खंडणी व सरपंच देशमुख यांची हत्या प्रकरणी बीड जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र हादरला होता.या हत्येतील आरोपी बीड जिल्हा कारागृहात असलेले वाल्मीक कराड व इतर आरोपीची आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सरकारी वकील व आरोपीचे वकील यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटे युक्तिवाद झाला.यामधील आरोपी असलेले विष्णू चाटे यांने मागील तारखेला देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावे यासाठी अर्ज केला होता परंतु, आज तो जामीन अर्ज मागे घेण्यात आल्याची व पुढील सुनावणी तीन जून रोजी असल्याची माहिती मिळती वकिलांनी दिली