बार्शी नाका भागातील यूवकांचा शिवसेनेते प्रवेश.
जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश.

बीड : (प्रतिनिधी) शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारून आज उल्हास गिराम यांच्या पक्ष कार्यास दोन महिने पुर्ण होत आहेत. त्यांची विचारसरणी, सामान्य लोकांच्या गरजाशी निगडित आंदोलने याला प्रभावित होऊन बीड शहरातील बार्शीनाका परिसरातील असंख्य तरुणांनी उल्हास गिराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
शिवसेना पक्षफुटी नंतर बीड जिल्यातील शिवसैनिक बॅकफुट आला होता. जिल्हाप्रमुख म्हणून उल्हास गिराम यांनी जबाबदारीचे भान ठेऊन जुन्या-नव्या शिवसैनिकांची मोट बांधून सामान्य शिवसैनिकांत उत्साह निर्माण केला. सामान्य जनता ज्या छोट छोटया समस्यानी ग्रासली आहे, हे हेरून आंदोलने उभारली.
उल्हास गिराम यांच्या याच कार्यपद्धतीला प्रभावित होऊन आज शेकडो तरुण पक्ष प्रवेशा संदर्भात विचारणा करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे आज बीड शहरातील बार्शीनका परिसरातील युवक मछिंद्र काळे, दिपक अंकुशे, परशुराम काळे, कृष्णा काळे, अनिल अंकुशे, सोनु रोकडे, दुसरा दीपक अंकुशे, करण अंकुशे, गोरख अंकुशे, पप्पु लोंढे, गणेश रोकडे, लखन काळे, अमोल लोंढे, मछिंद्र अंकुशे सह असंख्य युवकांनी प्रवेश केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ माहुवाले, सुशील पिंगळे, सतिशसिह परदेशीं, दिलीप पवार, रंगनाथ पैठणकर, विशाल तांबे सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.