आणखी एका गुंडावर MPDA हर्सूल कारागृहात रवानगी.
शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीत गणेश गिरीवर अनेक गुन्हे दाखल.

शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड अभिलेखावरील धोकादायक इसम आरोपी नामे गणेश भारत गिरी वय २३ वर्षे रा.इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड याचे विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे खडंणी मागणे, चारकाची वाहनाची तोडफोन करुन नुकसान करणे, मोटार सायकलची जाळुन नुकसान करने, दुखापत करण्याचे उद्देशाने मारहाण करणे, लोकांचा रस्ता अडवुन शिवीगाळ व दमदाटी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन दुखापत करणे, अशा प्रकारचे वेगवेगळे गंभीर स्वरुपाचे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत.
सदरचा आरोपी गणेश भारत गिरी वय २३ वर्षे रा. इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड याने पोलीस ठाणे हद्दीत तसेच बीड शहरात व नजीकच्या परीसरात त्याचे गुन्हेगारीने दहशत निर्माण करुन सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत केलेने सदर आरोपी विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करुन सदरचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड यांना सादर केलेला होता.
सदर प्रस्तावा वरुन मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड यांनी आरोपी नामे गणेश भारत गिरी वय २३ वर्षे रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नगर रोड, बीड यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती वदृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडी ओपायरेट्स) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अधिनियम सन १९८१ (सुधारणा) अधिनियम २००९, २०१५ चे कलम ३ (१) अन्वये १ वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह हर्सल छत्रपती संभाजीनगर येथे स्थानध्द करणेबाबत आदेश पारीत केले आहेत. सदर आदेशाप्रमाणे आरोपी नामे गणेश भारत गिरी वय २३ वर्षे रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नगर रोड, बीड यास आज रोजी ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारागृह हर्सल छत्रपती संभाजीनगर येथे कारागृहात जमा केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, सपोनि / जी.जे. क्षिरसागर, पोउपनि / माधव काटकर, पोह/2130 परजने, पोह/171 गायकवाड, पोशि/485 कांदे व पोशि/2221 बहिरवाळ यांनी केलेली आहे.