
रोहित पवार स्वतः भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत असा दावा माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील पंधरा ते सोहा आमदार पुन्हा शरद पवार गटात येणार असल्याचा दावा केला होता. यामध्ये प्रकाश सोळंके यांच्या नावाची चर्चा होती.
अनेक वेळा भेटीगाठी घेतल्या यावर एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” जो दावा करण्यात आला आहे, तो एक प्रचाराचा भाग आहे. परवा आमची बैठक झाली आहे
आहे. परवा आमची बैठक झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील कोणताही आमदार सोडून तिकडे जायला तयार नाही. उलटरोहित पवार स्वतः भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा भेटीगाठी घेतल्या आहेत. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे”, असा मोठा दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे.