सुरेश कुटेंच्या अडचणी पुन्हा वाढल्या.ज्ञानराधाचे अधिकारीही अडकणार
बीड आणि नेकनूरमध्ये पुन्हा गुन्हे दाखल

सुरेश कुटे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल
ज्ञानराधा मल्टीस्टेट चे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्यासह इतर संचालकावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे आतापर्यंत एकूण दाखल गुन्ह्याचे टोकलभर वजन सुरेश कुटे किती दिवस राहणार आहेत असा प्रश्न या निमित्ताने सर्वांना पडला आहे ज्ञानराधाचे सुरेश ज्ञानोबा कुठे यांनी ठेवीदाराची रक्कम परत केली नाही अनेक वेळा मागूनही चालढकल चालवली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत यातच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्यासह व्हईस चेअरमन यशवंत कुलकर्णी,सुशील श्रीराम हाटोळे उपकार्यकारी अधिकारी श्रीकांत अण्णासाहेब आमटे तसेच नारायण सुगंधराव शिंदे जनरल मॅनेजर निखिल रमेशराव कुलकर्णी शाखा अधिकारी बीड याशिवाय सौ अर्चना सुरेश कुटे सह इतरावर शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती आहे