संभाजी भिडेला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका.संभाजी ब्रिगेड.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध करणाऱ्या भिडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.

राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साही,आनंदी वातावरणाने पार पडत असताना संभाजी भिडे यांनी सहा जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला आहे.मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांनी या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बेताल वक्व्य केल्याने त्यांना शिवप्रेमीचा संभाजी ब्रिगेडने त्या वक्तव्याचा निषेध करत संभाजी भिडेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
आता तर संभाजी भिडे याने शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध आहे. ६ जून ही तारीख ‘नामशेष’ करून टाका असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही.
मराठा-बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतो आणि पोरांच्या डोक्यामध्ये धर्मांध,विकृत आणि जातीवादी विष पेरतो. हा माणूस महाराष्ट्रासाठी धोका आहे.६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. या घटनेला ३५१ वर्ष पूर्ण झाली आणि त्या दिवसाला हा माणूस जर ‘नामशेष’ करून टाका म्हणत असेल तर हा १००% शिवद्रोह आहे. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे.
पुणे:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करु नये, असं वक्तव्य करत संभाजी भिडे यांनी मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करु नये. तर त्या दिवशी साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद करावा आणि तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो.
भिडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.बी.बी.जाधव
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत असून ती आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मिते विषयी संभाजी भिडे यांनी चुकीचे वक्तव्य केले असून आमच्या व शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत संभाजी भिडे यांनी मीडिया समोर येऊन जाहीर माफी मागावी नसता त्यांना शिवप्रेमी महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत.असा इशारा बीड मधील मराठा सेवक बी.बी.जाधव यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा तारखेप्रमाणेच साजरा होईल तो कोणीही बंद करू शकत नाही.असे संभाजी ब्रिगेडने ठामपणे सांगितले आहे.