वंजारवाडीत सरपंचासह इतरांनी केला माजी सैनिकाच्या घरावर हल्ला.
माजी सैनिकाच्या कुटुंबाला बेदम मारहाण करत गाड्या,घरांवर दगडफेक..

बीड तालुक्यातील वंजारवाडी या आदर्श गावात सरपंच व त्यांच्या सहकार्याची माजी सैनिक विठ्ठल तांदळे यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात तीन महिला सह दोन पुरुषांना गंभीर दुखापत झाली आहे.यामध्ये एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाला,७५ वर्ष वय असलेल्या वृद्ध महिलेला देखील जबर मारहाण करण्यात आली आहे.सर्व जखमी बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वंजारवाडी या गावच्या पावसाळापूर्व स्वच्छता मोहीम राबवून नारळाचे झाडे गावात लावण्याची मोहीम सरपंच व गावकऱ्यांनी घेतली होती.मात्र नातेवाईकांचे लग्नकार्य असल्याने हे कुटुंब सहभागी झाले नव्हते.गावातील सरपंच मुलगा व ३०ते४०गावकऱ्यांनी घरी येऊन तुम्ही या मोहिमेत सामील न झाल्याने १००० रुपये दंड द्यावा लागेल अशी मागणी केली. परंतु आम्ही नातेवाईकाच्या घरी नेकनूर येथे लग्नकार्य असल्याने आम्हला या मोहिमेत सामील होता आले नाही असे सांगून देखील सरपंच व गावकऱ्यांनी घरावर हल्ला करत बेदम मारहाण करत दरातील चारचाकी सह दगडफेक केली.
जखमी कुटुंब बीड शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून बीड ग्रामीण पोलीसानी जखमीची भेट घेऊन संगीता कुंडलिक तांदळे यांच्या फिर्यादीवरून.१)वैजनाथ भगवान तांदळे२)विशाल भगवान तांदळे३)अंकुश दिनकर तांदळे४)महादेव तुकाराम तांदळे५)नवनाथ संतराम तांदळे.कलम११८/२,११५/२,७४,१८९/२,१९१/२,३५२,३२४(४),३२४(५) या कलमा अंतर्गत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.