
दिनांक 11 जून 2024 रोजी मंगळवार सकल मराठा समाज बीड जिल्ह्याच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती. सध्याचे पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शेतकऱ्यांच्या पीक पेरणीचे दिवस लक्षात घेता आणि मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून दिनांक 11 जून 2024 मंगळवार रोजी च्या बीड जिल्हा बंदची हाक मागे घेण्यात आली असून, बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व व्यापारी बांधव आणि सर्व समाज बांधव आणि बीड जिल्ह्यातील वासियांना विनंती करण्यात येत आहे की दिनांक 11 जून 2024 मंगळवार रोजी चा बीड जिल्हा बंदची हाक परत घेण्यात आलेली असून बीड जिल्हा बंद ठेवण्यात येणार नाही. असे सकल मराठा समाज बीड जिल्हा यांनी प्रसिध्द केले