ताज्या घडामोडी
बीड शहरातील प्रभाग क्र. 16,खासबाग,आडत मार्केट रस्ता कामास सुरुवात.
आनंद विर (प्रतिनिधी)

बीड शहरातील खासबाग आडत मार्केट यार्ड रस्ता बरेच वर्षापासून प्रलंबित होता, अडत मार्केटमध्ये खेड्यातून येणारे बरेच वाहने व शेतकरी आपला भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येतात त्यांना या खराब रस्त्याचा त्रास होत होता तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर पाणी साचून चालणे अवघड होत होते. माजी नगरसेवक अशपाक इनामदार यांनी या रस्त्याचे काम तात्काळ व्हावे यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. याचीच दखल घेऊन आज दिनांक 10 जुलै रोजी सकाळी प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली.