
वरून राजाने वेळेवर आगमन केल्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे. यानंतरही 14 तारखेपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्याकारणाने जमिनीतील उष्णता कमी होण्यास थोडा वेळ लागेल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता 14 तारखेनंतर लागवडीला सुरुवात करावी असे तज्ञांचे मत आहे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. तसेच शेजारी जिल्ह्यातील आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
जालना : ६३.१०, बदनापूर ७१.५०, भोकरदनः ८१, जाफराबाद ८०.३०, परतूर : ९९.१०, मंठा : ५५.२०, अंबड: ८५.५०, घनसावंगी : ७६.६० तर एकूण पाऊस ७६.८० एवढा झाला आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरपर्यंतची पावसाची वार्षिक सरासरी ६०३.१० मि.मी. असून आतापर्यंत ४४.२० मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहेत, प्रत्यक्षात ७६.८० मिमी पाऊस पडला.