कृषी कन्यांनी शेतकर्यांना दिली बिजांकुरण प्रात्याक्षिकाची माहिती
सतीश बहिर (प्रतिनिधी)

सौ .के.एस.के.(काकू)कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बिजांकडून या विषयावर प्रात्याक्षीकाद्वारे शेतकर्यांना माहिती दिली.
योग्य नियोजना अभावी दरवर्षी शेतकर्यांना बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीची वेळ येते त्यामुळे या प्रात्यक्षिकामुळे बियाण्याची उगवण्याची क्षमता पेरणीपूर्वीच चाचणी करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींनी शेतकर्यांना बिजांकुरण प्रदर्शनाबद्दल सविस्तर माहिती दिली. सोयाबीन या पिकाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कृषी कन्या खोड प्रतीक्षा, गवळी संध्या, पवार ज्योती, करांडे रूपाली, पाटील यशस्वी, खोले निकिता उपस्थित होत्या. ग्रामीण जागरूकता कार्यक्रम कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अनंत कृषी विकास प्रतिष्ठानचे सहसचिव डॉ.जी.व्ही. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच प्राचार्य एस.पी. मोरे, प्रा.व्ही.जी. तायडे, एस.एस. राठोड, पी.ए. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.