ब्रेकिंग न्यूज

सुधार ग्रहातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुली पोलिसांच्या ताब्यात.

API वर्षा व्हगाडे यांची सतर्कता.

वडवणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुधारगृहातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुली ताब्यात घेण्यात यश.

 पोलीस ठाणे वडवणी येथील 20 दिवसापूर्वी व पोलीस ठाणे दिंद्रुड येथील चार ते पाच महिन्यापूर्वी 02 अपहरणाचे गुन्हे दाखल होते या गुन्ह्यामध्ये पीडिता असलेल्या 02 अल्पवयीन मुली सरकारी महिला स्वाधार गृह बीड येथे दाखल होत्या. दिनांक 07 जून 2025 रोजी सकाळी या दोन्ही अल्पवयीन मुली महिला स्वाधार गृहातून पळून गेल्या. याची माहिती वडवणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना मिळाली, अशा मुली शहराबाहेर गेल्या तर त्यांचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतो याचे गांभीर्य ओळखून त्याचे शोधाबाबत अधिक तपास केला असता, या दोन्ही मुली विठ्ठल रखुमाई मंदिर, ग्रामसेवक कॉलनी बीड,परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वडवणीचे दुय्यम अधिकारी psi चव्हाण यांना सदर ठिकाणी तात्काळ पाठवून त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना थांबवून ठेवले, व शिवाजीनगर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री पवार यांना फोन करून माहिती देत शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील स्टाफ बोलावला. दोन्ही मुली पुन्हा स्वाधारगृहात दाखल करण्यासाठी शिवाजीनगर महिला पोलिसांचे ताब्यात दिल्या.त्यानंतर त्या महिला स्वाधारगृहाचे यांचेमार्फतिने अध्यक्ष बालकल्याण समिती यांच्याकडे हजर करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे HC 1664 रविंद्र गोवर्धन आघाव LHC 1034,शीतल केशव जोगदंड,Pc 2077 बाळु बाजीराव राहाडे,Pc 273 नवनाथ बंडू डाके यांनी केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button