
बीड शहरातील बार्शी नाका,प्रकाश आंबेडकर नगर भागातील रहिवाशी कविता सरवदे ह्या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.नातेवाईकाकडे बाहेर गावी गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटचा दरवाजा तोडून सोने,चांदी व रोख रक्कम असा दोन लक्ष चार हजार शंबर (204,100 )रुपये चा मुद्देमाल चोरून नेल्याने पेठ बीड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली.