ताज्या घडामोडी
न.प.पाणीपुरवठा कर्मचाऱ्यानी केले काम बंद
आठ ते दहा महिन्याचा पगार न मिळाल्याने ठिय्या आंदोलन

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे ढासळला असून त्यावर सी ओ अंधारे यांचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. वाल्मन हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून कामावर कार्यरत आहेत, गेल्या काही वर्षापासून गोल्डन कंट्रक्शन यांनी कामगारांचे आठ ते दहा महिन्याचा पगार थकवल्याने आज पाणी सोडणे काम बंद केल्याने शहरवासीयांना पाणी वेळेवर नाही मिळाल्याने नगरपरिषद कामकाजावर संताप व्यक्त करत आहेत.