ताज्या घडामोडी
बार्शी नाका पोलिस चौकी बंद
पोलिस अधिक्षकानी लक्ष घालून कायमस्वरूपी अधिकारी नेमणूक करावी

पेठ बीड पोलिस ठाण्याअंतर्गत बार्शी नाका हा संवेदनशील भाग असल्याने हा चौक शहराला जोडणारा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो.बऱ्याच वेळा या भागात भांडण,अपघात होतात त्याची तक्रार देण्यासाठी चौकीत गेले असता चौकीला कुलूप असल्याने त्यांना पेठ बीड पोलिस ठाण्यात जावे लागते.तसेच वाहतूक कोंडी होते.तेव्हा चौकी बंद असल्याने,नेमणूक असलेले पोलिस चौकीत नसल्याने मोठा अनर्थ होवू शकतो म्हणून पोलिस अधिकक्षकानी 24 तासासाठी अधिकारी नेमणूक करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.