
आनंद वीर(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घालत गायीच्या वासराला अक्षरशःफाडले त्यात त्याचा मृत्यू झाला या घटनेने गेवराई तालुका भयभीत झाला आहे.गेवराई तालुक्यातील अंतरवाला गावातील बाळासाहेब आर्दड यांच्या शेतातील गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवत फाडले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तत्काळ त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.