बीड शहराला दुर्गंधयुक्त व नाली मिश्रित पिण्याचे पाणी नळाला कसे येते पहा.
C.O.नीता अंधारे व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी हे पाणी प्यावे.

बीड जिल्ह्यातील सर्वच तलाव तुडुंब भरले असले तरी बीड शहरातील काही भागात पावसाळ्यात देखील दहा दिवसाला पाणी पुरवठा होत असल्याने “धरण उशाला अन् कोरड घशाला” असच म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.यामुळे नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजन कारभारावर संताप व्यक्त व्यक्त होत आहे.
बीड शहरातील बार्शी नाका भागात नळाला दुर्गंध युक्त,नाली मिश्रित येत असून नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या जीवनाशी खेळत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या भागातील सामाजिक कार्यकर्तेनी वारंवार लिकेज संदर्भात माहिती देऊन देखील सुपरवायझर व नगरपालिका प्रशासनातील कर्मचारी पाणी पुरवठा अधिकारी जाणीवपूर्व दुर्लक्ष करताना दिसत असल्याचे दिसत आहे.
नगरपालिकेकडून नाली मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध रोगाचा सामना करावा लागत असून याकडे नगरपालिका मुख्य अधिकारी गांभीर्याने पाहून संबंधित पाणीपुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देतील का?बीड शहरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याची मुख्याधिकारी यांना वेळ नसल्याची देखील तक्रार नागरिक करत असून शहरातील नगरसेवक मात्र नगरपालिका निवडणुकाना अवधी असल्याने दुर्लक्ष करत आहेत.बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ न झाल्यास तेच पाणी बीड मुख्य अधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांना पिण्यासाठी देण्यात येईल असा इशारा बार्शी नाका भागातील नागरिकांनी दिला आहे.