पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू.
बदल्या झाल्याने अनेक पोलिस कर्मचारी तणावाखाली.

बीड पोलिस दलामध्ये नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रिया मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून बदली होऊन गेलेले पोलीस कर्मचारी समीर मुंजावार हे अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत होते. आपलं कर्तव्य बजावत असताना आज सकाळी हृदयविकार तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रियेमध्ये बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यां मनामध्ये खदखद,ताणतणाव आहे. दोन दिवसांपूर्वी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने मुलांच्या शाळा सुरू झाल्यात नोकरीं एकीकडे, कुटुंब एकीकडे त्यामुळे अनेकांची तारेवरची कसरत होताना नक्कीच पाहायला मिळते. बहुतेक पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब बीड येथे स्थायिक झाले असून अनेक पोलिसांच्या मुलांची शिक्षण १०किंवा १२ वर्गात शिकत असल्याने, काही ना कोचिंग क्लासेस सुरू असल्याने त्या पोलीस कुटुंबाला अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे, काही पोलीस कर्मचारी तर सकाळी आंबेजोगाई शिरसाळा,परळी,केज ला कर्तव्यावर बसणे प्रवास करत आहेत तर काही कर्मचारी हे दुचाकी वरून ये जा करत आहेत यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही पोलीस कर्मचारी बदलीच्या नियमात बसत नसल्याने अन्याय झाल्याचे सांगत मॅट मध्ये देखील गेल्याची माहिती मिळत आहे.
बीड शहरातून आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्यापासून समीर मुंजावर हे तणावाखाली असल्याची माहिती कुटुंबाकडून बोलले जात आहे. समीर मुंजावर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने सर्व तो परिचित होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याने कुटुंबावर, नातेवाईकावर व मित्रपरिवार दुःखाचा डोंगर कोसळला असून हळूहळू व्यक्त होत आहे