परभणे वर आणखी ४ गुन्हे
सारिका बोर्डे चा FIR फाडला, पण ताब्यात घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

मागील काही दिवसा खाली साईनाथ विक्रम परभणे यांच्याविरुद्ध माननीय कोर्टात 156/3 खाली 120 (ब) 420, 408, 409, व महाराष्ट्र ठेवीदाराचे वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 2 व 4 प्रमाणे बरेच अर्ज माननीय गेवराई न्यायालयात दाखल केले होते त्याचा तपशील खालील प्रमाणे असून Cri.M.A 208/2024 आशा विरुद्ध साईनाथ Cri.M.A 188/2024लक्ष्मीबाई विरुद्ध साईनाथ Cri.M.A 193/2024श्रीकिसन विरुद्ध साईनाथ Cri.M.A 228/2024निरंतर विरुद्ध साईनाथ
या सर्व प्रकरणाची तारीख एकाच दिवशी ठेवण्यात आली होती तसेच गेवराई येथील दुसरे सहन्यायाधीश न्यायमूर्ती. आदरणीय. एन. ए. रणदिवे साहेब यांनी दि.12/06/2024 रोजी चार प्रकरणात अर्ज मंजूर करून पोलीस स्टेशन यांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले यावेळी फिर्यादीच्या वतीने ॲड शरद काळे यांनी काम पाहिले त्यांना ॲड शेख आयाज यांनी सहकार्य केले.