ताज्या घडामोडी
कामगार कार्यालयात बोगस लाभार्थी
पैसे द्या अन कोणीही लाभ घ्या.दोन हजार द्या किचन सेट घ्या.

बीड जिल्ह्यात अनेक बोगस कामगार दाखवून शासनाची लाखोंची फसवणूक केली जात आहे.मोल मजूर,बांधकाम कामगार,पेंटर,हमाल, विट भट्टीवर,मिस्त्री कामगार,फरशी कामगार सह इतर कामगारांना सुविधा मिळाव्यात गोर गरिबांना हक्कच घर,किचन सेट,अपघाती विमा,मुलांचे शिक्षण अश्या अनेक योजना शासनाने कामगार कार्यालयात योजना राबवल्या परंतु याचा फायदा बीड जिल्ह्यातील श्रीमंत लोक घेताना दिसून येत आहे.पैसे दिले की कामगार कार्यालय कोनालाही प्रमाणपत्र व योजनेचा लाभ देतात.त्यामुळे खरे लाभार्थीना योजनेपासून वंचित राहतात, त्यांना लाभ मिळत नाही.बोगस कामगारांवर करावी व त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या कामगार कार्यालयाचा परवाना रद्द करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.