ताज्या घडामोडी
बीड पोलिस भरती 170 जागासाठी 7000 च्यावर अर्ज.
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड पोलिस दलामध्ये 17O रिक्त जागेसाठी तब्बल सात हजारच्यावर अर्ज आले असून,19 जून 2024 रोजी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रीया सुरू होणार आहे.बुधवार पासून सर्व मैदानी चाचणीचे वेळापत्रक पोलिस अधीक्षक यांनी जाहीर केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, गुन्हे शाखा निरीक्षक संतोष साबळे यांची उपस्थिती होती. मैदानी चाचणी ही पारदर्शक होणारा असून भरती प्रक्रियेमध्ये सतर्कता बाळगण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड व गुप्त वार्ता बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.