ताज्या घडामोडी
ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांना पाच दिवसाची कोठडी
तारीख पे तारीख ने ठेवीदारांमध्ये संतापाची लाट

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा अध्यक्ष सुरेश कुटे यांनी ठेवीदाराचे पैसे वेळेत न दिल्याने काही ठेवीदारांनी कुटे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.दोन दिवसापूर्वी माजलगाव न्यायालयानें कुटेना जामीन मंजूर केला असता,शिवाजीनगर बीड पोलिसांनी कुटे यांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची कोठडी सुरेश कुटे यांना सुनावली आहे. ठेवीदाराचा जीव टांगणीला लागला असून ठेवीदार संताप व्यक्त करत आहेत.कुटेनी ठेवीदाराचे पैसे तात्काळ द्यावेत अशी मागणी होत आहे.