गुण नियंत्रक विभाग माजलगाव चे कामे पाहून हैराण ,
बीड नगरपालिकेचे कामे तपासली तर काय होईल ?

माजलगाव शहरात मागील एक वर्षाच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे झाली आहे. मात्र ही कामे निकृष्ट झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या केलेल्या कामाचे बील उचलण्यासाठी गुण नियंत्रकांकडून गुत्तेदार सांगतील तेथीलच तपासणी करत खराब निकृष्ट काम साडून ठरावीक ठिकाणी तपासणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तक्रार केली गेली आहे.
माजलगाव शहरात मागील एक वर्षाच्या कार्यकाळात दलित वस्ती, नगरपालिका विकास फंड, जिल्हा नियोजन सह विविध योजनेच्या कामासाठी ६० ते ६५ कोटी रूपये खर्च करत रस्ते ,नाल्या , पेव्हर ब्लॉक बसवणे इत्यादी करण्यात आली. यातील काही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तर काही कामे नगरपालिके मार्फत करण्यात आली. दोन्ही विभागामार्फत करण्यात आलेली कामे ही नित्कृष्ट दर्जाची करण्यात आली. ही कामे झाली असताना केवळ आठ दिवसात रस्ते पूर्णत: उखडले. शहरात करण्यात आलेली कामे खराब होत असताना येथील लोकप्रतिनिधी , राजकीय नेते , सामाजिक संघटनांनी या विरोधात ब्र शब्दही काढला नाही. यामुळे संबंधित गुत्तेदारांकडून ही बिले उचलण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. न.पच्या कामाची गुण नियंत्रकाकडून शनिवारी १६ कामांची तपासणी करण्यात आली. दोन विभागात ही तपासणी करण्यात आली. ही तपासणी करतेवेळी गुत्तेदार त्यांच्यासोबतच होते. गुत्तेदार सांगतील तशा प्रकारची तपासणी हे गुण नियंत्रक करताना दिसून आले. खराब रस्ता झाला असतांना ठरावीक भागातील रस्त्याची तपासणी त्यांच्याकडून करण्यात आली. रस्ते तपासणीसाठी बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील अधिव्याख्याता प्रा.एस.बी. सय्यद, प्रा.डी.बी.करवट, प्रा.ए.जी.जाधव, प्रा.जे. एस. सय्यद उपस्थित होते. विशेष म्हणजे पालिका कर्मचारी व अभियंता सोबत नव्हते.
गुण नियंत्रकाची चौकशी करण्याची केली मागणी दरम्यान, कोट्यवधींच्या निधीतून रस्ते, नाल्या केल्या गेल्या. मात्र, गुणनियंत्रकांनी कंत्राटदारासोबत पहाणी करुन सोयिस्कर तपासणी केली. त्यामुळे या गुणनियंत्रक पथकाचीच चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कुरे यांनी केली .