
आनंद वीर(प्रतिनिधी) पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणास बसलेल्या प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना उपोषण स्थळी जाऊन भेट दिली.मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी लेखी हमी सरकारने द्यावी, काही जिल्ह्यात चुकीचे प्रमाणपत्र देत असतील तर ते आम्हाला मान्य नाही.वंचिताचा आवाज सरकारने ऐकावा यांची प्रकृती खालावत चालली असल्याने दोघांचेही उपोषण सोडण्यासाठी सरकारने तत्परता दाखवावी अशी विनंती पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केली आहे.