
आनंद वीर(प्रतिनिधी)जालना जिल्ह्यातील वडोगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रा.हाके व वाघमारे हे उपोषणास बसले आहेत,आंदोलनास पाठिंबा म्हणून काल आष्टी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी हतोला गावात उपोषण केले,तर अजबजूच्या 25 गावच्या सरपंचांनी उपोषणास पाठींबा दिला.रात्री उशिरा परळी तालुक्यातील पांगरी गावात रस्त्यावर टायर जाळत,रस्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली.त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती.