
आनंद वीर (प्रतिनिधी) शरद बाळासाहेब जगताप यांनी अंबाजोगाई शहरातील बँकेतून रक्कम काढून गावाकडे दुचाकीवरून जात असताना,चोरट्याने पाठलाग करत हँडलला अडकवलेली पैश्याची पिशवी हिसकावून भरदिवसा दोन लाख पाच हजार रुपयाची चोरी झाल्याने पोलिसां समोर एक प्रकारचे आवाहन दिले आहे.या प्रकरणी आंबेजोगाई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दिवसा ढवळ्या असा लुटीचा प्रकार घडल्याने पोलिसाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अशा बऱ्याच घटनामुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांचा चोरावर कसलाच धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.