
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड पोलिस दलातील रिक्त जागेसाठी 19 जून पासून मैदानी चाचणी सुरू झाल्याने बाहेरून येणाऱ्या उमेदवाराची राहण्याची गैरसोय होवू नये सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्त्यानी उघड्यावर झोपू नये,या आधीच्या पोलिस भरती मध्ये उमेदवार हे उघड्यावर,रस्त्यावर,मैदानातच झोपले होते म्हणून बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बाहेर गावाहून भरतीसाठी आलेल्याची राहण्याची व्यवस्था पोलीस बॅरेक मध्ये करण्यात केली आहे.त्यासाठी भरतीसाठी आलेल्यांनी ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
7249089102 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन बीड पोलिस अशीक्षकानी केले आहे.पोलिस अधीक्षक यांनच्या स्तुत्य उपक्रमा बद्दल सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.