
आनंद वीर(प्रतिनिधी) ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा.हाके व वाघमारे त्यांचे उपोषणाचा सातवा दिवस असून,प्रकृती खालावत असताना सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नसल्याने ओबीसी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरत आहे,बऱ्याच ठिकाणी रस्ता रोको करत, रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला जात आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे.आज सायंकाळी आठ वाजता सिरसाळा येथे रस्त्यावर टायर जाळून सरकारच्या निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.