
आनंद वीर(प्रतिनिधी) भाजप नेत्या,माझी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्याने हा पराभव कार्यकर्त्याच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने आतापर्यंत विविध ठिकाणी चार जणांनी आपले जीवन संपवल आहे.त्यामुळे ह्या आत्महत्या रोखायच्या असतील तर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.