ताज्या घडामोडी
शरद पवार प्रा.हाकेना भेटायला जाणार नाही.
शरद पवार यांना ओबीसी आंदोलकांची एलर्जी आहे का?

आनंद वीर (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा.हाके व वाघमारे हे ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून उपोषणास बसले आहेत, त्यांची प्रकृती खालावत चालल्याने ओबीसी नेते,कार्यकर्ते उपोषण स्थळी प्रा.हाके यांनी भेटण्यासाठी हजारोच्या संख्येने येत आहेत,परंतु राजकारणातील सर्वात मोठा नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते.तुम्ही हाके यांना भेटण्यासाठी जाणार का? असा प्रश्न काही वृत्तवाहिन्यांनी विचारले असता शरद पवार जाणार नाही बोलले त्यामुळे फक्त मतासाठीच ओबीसी समाज चालतो का?असा संतप्त सवाल ओबीसी कार्यकर्ते नेते करत आहेत.