
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील विवीध जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या 51 शाखा आहेत.सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना जास्त दराच(टक्केवारीचे)आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केली आहे.ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे हे वेळीवेळी सोशल मीडिया समोर येऊन पैसे देण्याचे आश्वासन देत होते.काही ठेवीदारांनी सुरेश कुटे सह संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला असून,विदेशी फंड मंजूर झाल्याचे कुटे कडून सांगण्यात येत होते परंतु जिल्यातील बऱ्याच शाखा बीड आर्थिक गुन्हा विभागकडून सिल करण्यात आल्या आहेत.तसेच त्यांचा आलिशान वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत.आज मिळालेल्या माहिती नुसार कोणताही विदेशी फंड सुरेश कुटेचा मंजूर झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.कुटे हे खोटं बोलत होते हे उघड झाले असल्याने गोरगरीब ठेविदाराचे पैसे मिळण्याची आशा मावळली आहे.