
आनंद वीर (प्रतिनीधी)बीड. ज्ञानराधा चे चेअरमन सुरेश कुटे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद होत असल्याने अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.आज दिनांक 21 जून रोजी कोठडी संपल्याने बीड शिवाजीनगर पोलिसांनी सुरेश कुटे यांना बीड न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आणखी चौकशीसाठी,तपासासाठी कोठडीत वाढ मागितली मा.न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची कोठडी मंजूर केली.सुरेश कुटे आशिष पटोदकर यांनी नजरकैदेत (घरी)राहून काम करण्यासाठी अर्ज केला होता,परंतु तोही अर्ज न्यायालयाने नामंजूर केला त्यामुळे कुटे यांनच्या अडचणीत व न्यायालयीन कोठडी वाढ झाली आहे.