कुणबी प्रमाणपत्र चुकीचे दिले का?चौकशी करा पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण केले होते,सरकारने ज्यांनच्याकडे कुणबी नोंदी असतील त्यांना या आरक्षणाचा फायदा होईल असे जाहीर केले होते.म्हणून प्रशासना कडून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते.त्यावर आता पंकजा मुंडे यांनी अक्षेप घेतला असून.सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचे कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत का?याची चौकशी करून ते रद्द करण्यात यावे तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही याची स्पष्टता व लेखी द्यावे अशी मागणी भाजप च्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केली आहे.वडीगोद्री ते सुरू असलेल्या आंदोलना बाबद ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलण्यात आली होती या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,पंकजा मुंडे यासह ओबीसीचे नेते शिष्टमंडळ उपस्थित होते.