
ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी वडिगोद्री येथे प्रा.हाके व वाघमारे यांच्या उपोषणाचां आज दहावा दिवस आहे.आज छगन भुजबळ उपोषण स्थळी भेट देणार आहेत.शासनाकडून बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झाल्याचा आरोप प्रा.हाके कडून करण्यात आला आहे.त्यामुळे बोगस कुणबी प्रमाणपत्र शासनाने रद्द करून ते प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर व घेनारावर कारवाई करावी.तसेच सगे-सोयरे बाबद ज्या हरकती आल्या आहेत त्यावर मुख्यमंत्री,मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन आम्हला लेखी स्वरुपात द्यावे अशी मागणी प्रा.हाके यांनी केली आहे.