
बीड शहरातील बार्शी नाका भागातील श्री छत्रपती शाहू बँकेचे एटीएम मशीन चोरट्याने पळवण्याची घटना ताजी असताना मशीन पळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मशीनला लावलेली तार तुटल्याने ATM चोरीचा प्रयत्न फसल्याने चोर पसर झाले.अशीच घटना धारूर -तेलगाव रस्त्यावरील SBI बँकेचे एटीएम मशीन पिकअप वाहनात टाकून पळवण्याचा प्रयत्न केला, या मशीनमध्ये वीस लाखाच्या वर रक्कम होती,पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी वाहन गेले त्या दिशेने पाठलाग केला असता माजलगाव येथील जायकवाडी परिसरात पिकअप वाहन व पळवलेली मशीन आढळून आली, ATM मशीन न फुटल्याने रक्कम सुरक्षित असलीची माहिती मिळाली असून चोरीमध्ये वापरलेली पिकअप हे औरंगाबाद येथून चोरल्याचे उघडकीस झाले आहे.एटीएम मशीन पळवण्याचा प्रकारात वाढ झाली असून चोरटे सराईत असल्याचे दिसत आहे.पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलें तर आणखी गुन्हे उघडकीस येतील.